कोल्हापूर (प्रतिनिधी) : नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेल्या शिवसेनेच्या ‘शिवालय’ या शहर कार्यालयाचे उद्घाटन पक्ष स्थापनेच्या वर्धापन दिनी म्हणजे रविवार, दि.१९ जून रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

समाजकार्याच्या प्रत्येक कामात, चळवळीत हजारो शिवसैनिकांना बळ देणारी, लाखो नागरिकांना न्याय हक्क मिळवून देणारी, १२ महिने २४ तास जनसेवेसाठी उपलब्ध असणारी वास्तू म्हणजे शिवालय’ होय. हजारो रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया, वैद्यकीय निधीचा लाभ देणे, दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना विनाडोनेशन कॉलेज, शाळामध्ये प्रवेश, युवा वर्गाला रोजगाराचे माध्यम, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये मदतीचा केंद्रबिंदू हे शिवालय आहे. महिला सक्षमीकरण, महिला रोजगार निर्मिती, बचत गटांना न्याय देणारे हक्काचे ठिकाण म्हणून माता-भगिनी शिवालयकडे पाहतात, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.