कपिलेश्वर (प्रतिनिधी) : सध्या भौतिक सुख-समृध्दी हव्यास व विकासाच्या नावाखाली खेडेगावातील पूर्वीच्या समृध्द ग्रामसंस्कृतीच्या महान वारसाचे एक-एक खिळे निखळत चालले आहेत. हे समाज स्वास्थ्य व असित्वाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. या सर्वांची पुन्हा अनुभूती घ्यावयाची असेल तर अनिरुध्द गुरव लिखित ‘आठवणीतला गाव’ हा ललित लेखसंग्रह दुर्बीण ठरेल, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित लेखक किरण गुरव यांनी केले.

दूधसाखर महाविद्यालयात बिद्री (ता. कागल) येथे झालेल्या भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी येथील नवलेखक अनिरुध्द गुरव यांच्या ‘आठवणीतला गाव’ या ललित लेखसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर होते. दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

लेखक अनिरुध्द गुरव यांचा सत्कार व पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्य बाळ पोतदार, संतोष बामणे (बेळगाव), संतोष देसाई (मुंबई), प्रकाश केसरकर, मनोहर पाटील, संदीप बेडेकर, सचिन भोईर, दीपक देसाई, टिक्केवाडीच्या सरपंच कल्पना पाटील, डॉ. एम. एच. बारड, मुरलीधर पाटील, विश्वंभर कुलकर्णी, साताप्पा गुरव, उदय गुरव, सत्यजित वेतुर्लेकर, भरत गुरव आदी उपस्थित होते.