क्रीडाईच्या राज्याध्यक्षपदी राजीव परीख यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रीडाई महाराष्ट्र या बांधकाम व्यावसायिकांच्या राज्यपातळीवरील संघटनेच्या अध्यक्षपदी राजीव परीख यांची यांची २०१९-२१ या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली. परीख हे १२ वर्षांपासून क्रीडाई महाराष्ट्राच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी मागील ६ वर्षे या संघटनेचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. सन २००१ मध्ये बाळ पाटणकर यांनी अध्यक्षपद भूषविलेले होते. तद्नंतर १८ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान राजीव परीख यांना मिळालेले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

१ एप्रिल २०१९ पासून सुरू होणा-या दोन वर्षाच्या कालावधीकरिता विद्यमान अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. या निवडीसाठी क्रिडाई नॅशनलचे नूतन अध्यक्ष सतीश मगर तसेच शांतीलाल कटारिया यांचे मार्गदर्शनाबरोबरच क्रिडाई कोल्हापूरचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. क्रिडाई महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्यांनी गृहबांधणी क्षेत्राविषयक विविध शासकीय धोरणे निश्चितीकरण,  करविषयक सुधारणा,  बांधकाम नियंत्रण नियमावलींमध्ये शासकीय समिती सदस्य म्हणून वेळोवेळी उपयुक्त सूचना व फेरबदल,  रेडीरेकनर दर,  ‘ब’ सत्ताप्रकार, शेरी इनाम या व अशा अनेक बाबींवर त्यांनी आवाज उठवून शासनास सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. राजीव परीख हे स्वतः अभियांत्रिकी पदवीधर असून कोल्हापूर स्थित मे.  सूरज इस्टेट डेव्हलपर्स या भागीदारी फर्मच्या माध्यमातून मागील ३० वर्षे आनंद माने, सुनीत परीख, चेतन वसा यांच्या सहयोगाने कोल्हापूर व पुणे परिसरात विविध रहिवासी व व्यापारी प्रकल्पांचे दर्जेदार बांधकाम ते करीत आहेत.

सन २००९-२०१३ या कालावधीकरिता त्यांनी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्षपद भूषविलेले होते.  व त्याचबरोबर रोटरी क्लब, रोटरी ट्रस्ट, जीतो कोल्हापूर चॅप्टर, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशन, नॅब, स्वयम् मतीमंद स्कुल आदी संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून सामाजिक कार्य केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे