भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा : ‘पिरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स’ माहितीपटाला ‘ऑस्कर’

लॉस एंजेलिस (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारतात तयार झालेल्या एका चित्रपटाला यश आले आहे. पीरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर मिळाला आहे. हा माहितीपट उत्तर प्रदेशातील हापुड या गावातील मुलींच्या जीवनावर बनला आहे. मासिक पाळीशी संबंधित समज गैरसमजांवर या माहितीपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

या माहितीपटाची गोष्ट, विषय आणि कलाकार हे भारतीय आहेत. पंचवीस मिनिटांच्या या माहितीपटात खऱ्या व्यक्तींनी काम केले आहे. हा माहितीपट बनवण्यासाठी कॅलिफोर्नियाच्या ऑकवुड स्कूलचे बारा विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका मेलिसा बर्टन यांनी पुढाकार घेतला होता.

ऑकवुड स्कूलच्या एका विद्यार्थ्याने एका लेखामध्ये मासिक पाळीशी संबंधित असणाऱ्या गैरसमजाविषयी आणि मुख्यतः लाजेविषयी एक लेख वाचला आणि त्याने एका सेवाभावी संस्थेशी संपर्क साधला. त्याने निधी जमवून गावातील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन बनवणारी मशीन दान केली आणि त्यानंतर जागरुकता येण्याच्या उद्देशाने हा माहितीपट बनवला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे