नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे ८,५८२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशातील कोविड रुग्णांची संख्या ४४,५१३ पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवीन रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. त्याचवेळी, एका दिवसात १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल कोरोनाचे ८,३२९ नवीन रुग्ण आढळले. कालच्या आकडेवारीनुसार, कोरोना प्रकरणांमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४४,५१३ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत.