गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटीच्या जोतिर्लिंग मंदिर आणि गणपती मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी दानपेट्या ९ किंवा १० जूनच्या पहाटे फोडून सुमारे २० हजारांची रोकड लंपास केली. या बाबतची तक्रार मंदिराचे पुजारी संदिप गुरव यांनी भुदरगड पोलीस स्टेशनला दिली.

पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, ९ किंवा १० जूनच्या पहाटे   अज्ञात चोरट्यांनी जोतिर्लिंग मंदिराच्या सभामंडपातील दानपेटीचे कुलूप व साखळी तोडून अंदाजे १५ पंधरा हजारांची रोकड लंपास केली. तसेच तसेच शेजारीच असणाऱ्या गणपती मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे ५ हजारांची रक्कम चोरल्याची तक्रार भुदरगड पोलीस स्टेशनला झाली आहे.

घटनास्थळी पोलीसांनी शोधमोहिम राबवत श्वान पथकाच्या सहाय्याने शोध घेतला पण यश आले नाही. मंदिरात नव्याने दुसरी एक दानपेटी उभारण्यात आली आहे ती पेटी मात्र चोरटे फोडू शकले नाहीत. भुदरगड पोलीसांचा तपास सुरु आहे.