‘फोटोग्राफ’ चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही : नवाजु्द्दीन सिद्दकी

मुंबई (प्रतिनिधी) : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आता संपूर्ण बॉलिवूड एकवटले आहे. बॉलिवूड कलाकरांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे. तसेच कुठलाही भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीनेही या निर्णयाचे स्वागत केले असून आपला आगामी चित्रपट ‘फोटोग्राफ’ पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचे सांगितले आहे.

भारतातील चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचे जाहीर केले होते. यात लुकाछुपी, अर्जुन पटियाला, मेड इन चायना, नोटबुक या चित्रपटांचा समावेश होता. बॉलिवूडच्या कलाकारांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. नवाजुद्दिन सिद्दिकीचा आगामी चित्रपट ‘फोटोग्राफ’ हा ‘लंच बॉक्सचे’ दिग्गर्शक रितेश बत्राने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात नवाजुद्दिन बरोबर दंगल फेम सान्या मल्होत्रा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे