कुंभोज (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे एका महिलेवर वानराने हल्ला केला. त्यामुळे ही महिला जखमी झाली असून तिच्या डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे

कुंभोज-बाहुबली परीसरात शिक्षण संस्था असल्याने इथे वानरांचा मोठा उपद्रव वाढला आहे. येत्या दोन दिवसात शाळा सुरू होणार असल्याने ही महिला शाळेची स्वच्छता करीत होती. यावेळी शाळेच्या मैदानावर ही महिला येत असताना वानराने मागून तिच्यावर हल्ला केला. तसेच तिचा चावा घेण्याचाही प्रयत्न केला, परिसरात असणाऱ्या नागरिकांनी हुसकावलेमुळे महिला वानरापासून वाचली. त्यामुळे या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.