शासनाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ‘बांधकाम’ तांत्रिक संघटनांचा पुण्यात १२ मार्चला मोर्चा

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका ड वर्ग विकास नियंञण नियमावली, जिल्‍हा प्रादेशिक योजना, कोल्‍हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण व पूर नियंञण रेषा या संदर्भातील येत असलेल्‍या अडचणींमुळे शहर व जिल्‍ह्रयाच्‍या विकासावर विपरित परिणाम झाला आहे. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. याच्या निषेधार्थ असोसिएशन ऑफ आर्किटेक्‍टस अॅन्‍ड इंजिनिअर्सच्‍या वतीने जिल्‍ह्रयातील सर्व तांञिक संघटनांना सोबत घेत १२ मार्च रोजी पुणे येथील संचालक, नगर रचना, पुणे व मुख्‍य अभियंता पाटबंधारे विभाग, पुणे विभाग यांच्‍या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्यमनगर येथील सामाणी हॉलमध्‍ये आज (शुक्रवार) आयोजित जिल्‍ह्रयातील तांत्रिक संघटनांच्‍या प्रतिनिधींच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

सन २०१६ मध्‍ये महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर सह इतर १४ महानगरपालिकांसाठी ड वर्ग विकास नियंञण नियमावली शासनाने अंमलात आणली. त्‍याच्‍या अंमलबजावणी आलेल्‍या अडचणींमुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्‍या व्‍यवसायावर परिणाम होउन नगर रचना विभागाशी संबंधित सर्व कामांमध्‍ये दिरंगाई होऊ लागली. यातील काही नियमांचे स्‍पष्‍टीकरण शासनस्‍तरावर प्रलंबित आहे. तसेच महानपालिकेच्‍या नगर रचना विभागातून मिळत असलेला महसूलामध्‍ये प्रचंड तूट आलेली आहे. त्यामुळे ड वर्ग विकास नियंञण नियमावली रद्दच करावी व नवीन तिसरा विकास आराखड्या सोबत कोल्‍हापूर महानगरपालिकेने नवीन विकास नियंत्रण नियमावली तयार करावी अशी मागणी करण्यात आली.

शहराची हद्दवाढ न झाल्‍याने व प्राधिकरणाची अवस्‍था पाहता बहुतांशी विकास सुरू असलेल्‍या या क्षेञामध्‍ये संभाव्‍य पूर नियंत्रण रेषेच्‍या नवीन आखणीनुसार होणारा परिणाम याची चर्चा होउन अभ्‍यासपूर्वक तांत्रिक दृष्‍ट्या हा विषय शासन दरबारी मांडण्‍यात यावा असा निर्णय सभेमध्‍ये  घेण्‍यात आला. शहर व जिल्‍ह्रयातील विविध नगर रचना विभागातील कार्यालयामध्‍ये आवश्‍यक असणाऱ्या तांत्रिक कर्मचारी व अधिकारी वर्गाची संख्‍या खूपच कमी असल्‍याने याचा शहर व जिल्‍ह्रयातील विकासावर विपरित परिणाम होत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून शासनास दखल घेणेस भाग पाडण्‍यासाठी दिनांक १२ मार्च  रोजी पुणे येथील संचालक, नगर रचना, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे व मुख्‍य अभियंता पाठबंधारे विभाग, पुणे विभाग, यांच्‍या कार्यालयावर मोर्चाने काढून निदर्शने करून निवेदन देण्याचा निर्णय घेण्‍यात आला. तसेच शासनाने वेळीच दखल न घेतल्‍यास प्रसंगी न्‍यायालयात दाद मागण्‍याचाही निर्णय घेण्‍यात आला.

या वेळी झालेल्‍या चर्चेमध्‍ये असोसिएशनचे अध्‍यक्ष इंजि. अजय कोराणे, असोसिएशनचे माजी अध्‍यक्ष आर्कि. राजेंद्र सावंत, इंडियन इन्‍स्‍टीट्यूट ऑफ आर्किटेक्‍टसचे वर्कींग कमिटी चेअरमन विजय कोराणे, असोसिएशनचे उपाध्‍यक्ष विजय चोपदार, संदीप घाटगे, नंदकुमार घाटगे, बलराम महाजन, रवी पाटील, तसेच संचालक अनिल घाटगे, प्रशांत काटे, विजय पाटील, उमेश्‍ कुंभार, उदय निचिते, सभासद जिया मोमीन, प्रविण पाटील, वंदना पुसाळकर, सेक्रेटरी राज डोंगळे, अभय देशपांडे आदी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे