कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे तडफदार नेतृत्व आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर व जिल्हा शिवसेना आणि सर्व संघटनेच्या वतीने कोल्हापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिये येथील रामानंदनगर करुणालय बालगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. आर. के. नगरमधील  मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. दसरा चौक येथे मोफत ‘कोल्हापूर थाळी’ देण्यात आली. हा वाढदिवस महापालिकेच्या माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, शिवसेना उपशहरप्रमुख विशाल देवकुळे यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. यावेळी उमेश उत्तुरे, उपशहरप्रमुख रघुनाथ टिपुगडे, अंकुश निपाणीकर, सनराज शिंदे, असिफ मुलाणी, अल्ताफ मकानदार, अनुप देवकुळे, संदीप देवकुळे, सुशील संकपाळ, राहुल कांबळे, विशाल जाधव, सूरज कांबळे, कुमोद सुरवसे, नीलेश दळवी, पुष्कराज शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.