पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरात छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा व्हावा, यासाठी पुढाकार घेणाऱ्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सह्याद्री प्रतिष्ठान, मुळशी यांच्या वतीने ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कार’ देऊन शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी खा. शरद पवार यांनी, हसन मुश्रीफ सारख्या इतक्या धडाडीनं काम करणारा एकही आमदार महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात सापडणार नसल्याचे प्रतिपादन केले.

खा. शरद पवार म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्या समाजाचे पाच टक्केही मतदार त्यांच्या मतदारसंघात नाहीत. मात्र तरीही ते सलग पाचवेळा कागलमधून निवडून येतात. समाजातील शेवटच्या घटकाला लाभ पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले कष्ट हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. मुश्रीफ यांचे काम हीच त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कामामुळेच गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवले आहे. दरवर्षी हजारो रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठीची त्यांची धडपड असो किंवा कामगारांच्या कल्याणासाठी त्यांनी राबवलेल्या योजना असोत, इतक्या धडाडीनं काम करणारा एकही आमदार महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात सापडणार नसल्याचे सांगितले.

तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सह्याद्री प्रतिष्ठान, मुळशी यांच्या वतीने ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कार’ देऊन शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मेघडंबरीतील शिवमूर्ती, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.