कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे आज (सोमवार) वाडीचरण येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्या वाहनधारकाला आपला पाय गमवावा लागला आहे. आकाश अशोक चोपडे (वय ३०, रा. सागांव, ता. शिराळा, जि. सांगली) असे त्यांचे नाव असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चोपडे आणि त्यांचे मित्र मयूर मंगेश कांबळे (रा. हुपरी) हे जात होते. यावेळी सरुडकडून बांबवडेकडे येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये आकाश चोपडे यांना आपला पाय गमवावा लागला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मात्र, यामध्ये धडक दिलेल्या अज्ञात वाहनाने पोबारा केला आहे.