कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवशाही आणि होळकरशाहीचा खरा इतिहास जाणून घ्यावे, असे प्रतिपादन, प्रा. अरूण घोडके यांनी केले. ते शाहू स्मारक येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. रणजित गावडे होते.

प्रा. घोडके म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रात बहुजन समाजाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला जातोय व तो चुकीचा इतिहास सांगून जनतेला जाती-धर्माच्या बंधनात अडकून अज्ञानी केले जाते आहे. याकडं बहुजन समाजाने पाहून खरा इतिहास जाणून घेऊन वैचारिक क्रांती करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यकाळ भयावह असल्याची भावना प्रा. घोडके यांनी व्यक्त केली.

यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, पीआरपीचे सोमनाथ घोडेराव,  मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे आदी उपस्थित होते.