कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुरगू्ड, ता. कागल येथील लिटल मास्टर गुरुकुलम हुतात्मा स्मारक शाळेमधील चौथीचा विद्यार्थी ध्रुव मुरलीधर ताडे याने नॅशनल स्कॉलर परीक्षेत (एनएसएसई) २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

गतवर्षी त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्याला लिटल मास्टर गुरुकुलमच्या व्यवस्थापिका सुमन आणावकर, वर्गशिक्षिका सरिता रणवरे व स्टाफ तसेच वडील मुरलीधर आणि आई संगीता यांचे मार्गदर्शन लाभले.