कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली असल्याचे चित्र दिसून येत आहे. जर कोरोनाची रुग्ण संख्या वाढत राहिली तर याचा परिणाम महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीवर होऊ शकतो असे विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वांनाच बसला होता. त्यानंतर हळूहळू हि रुग्णसंख्या घटत गेली व परीस्थिती पूर्वपदावर आली परंतु परंतु गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचे आकडे वाढल्याचे दिसून येत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहे. अशातच, आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, जर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिली तर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. पूर्व निर्धारित कार्याक्रनानुसार या निवडणुका साधारणतः पावसाळ्यानंतर होणार आहेत. पण पावसाळ्याच्या या दोन तीन महिन्यांमध्ये जर कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली तर आपण राज्य निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत कि निवडणुकीच्या दरम्यान लोकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा धोका पुन्हा उद्भवू शकतो त्यामुळे निवडणुका कोरोनाची परिस्थिती पाहून घ्यावी असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

यामुळे येत्या काही दिवसात मध्ये कोरोनाची परिस्थिती कशी राहील यावर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.