धामोड (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील केळशी बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कृष्णात पाटील यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच तानाजी लहू कोदले यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सरपंच के. एल. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

सरपंच के. एल. पाटील म्हणाले, एक गाव आणि अनेक वाड्यांची ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. सर्वांना या पदाचा मान मिळावा, यासाठी गेल्या पाच वर्षांत फेरबदल करून आम्ही न्याय दिलेला आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी दीपक बागडी यांनी काम पाहिले.