ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचं आज (गुरुवारी) सकाळी निधन झालं. मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते आजारी होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजश्री प्रॉडक्शन हाऊसनेही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राजकुमार बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती केली. ‘पिया का घर’, ‘प्रेम रतन धन पायो’,’ ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’ असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिले आहेत. १५ फेब्रुवारीला राजकुमार यांची निर्मिती असलेला ‘हम चार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे