कोल्हापूर (प्रतिनिधी) : २५ जिल्हा परिषद आणि त्यांअतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांनी जिल्ह्यातील जि.प. निवडणूक विभाग आणि पं.स. निर्वाचकगणाच्या प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता दिली आहे.

या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा २ जून असून प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी २ ते ८ जून असा आहे. हरकती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, छत्रपती शिवाजी सभागृह येथे कार्यालयीन वेळेत स्विकारल्या जातील, अशी माहिती नोडल अधिकारी जिल्हा परिषद पंचायत तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळविले आहे.