महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या अध्यक्षपदी डॉ. राजकुमार पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या अध्यक्षपदी जगद्गुऱ॒ पंचाचार्य होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली. नुकतीच मुंबई येथील कौन्सिलच्या कार्यालयात निवडणूक पार पडली. मुंबई समचिकित्सा वैद्यकीय व्यावसायिक कायदा १९६० च्या प्रकरण २, कलम ४ अंतर्गत नियम व उपनियम यांना अनुसरून त्यांची निवडणूक घेण्यात आली.

राज्यातील सुमारे ७०,००० होमिओपॅथीक वैद्यकीय व्यावसायिकांचे व्यावसायिक नोंदणी करणे, व्यावसायिकांबद्दल आलेल्या तक्रारींची सुनावणी करून नोंदणी निलंबित किंवा रद्द करणे, केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक धोरणांचे वेळोवेळी पुर्नरीक्षण करून त्यामध्ये सुधारणा व विकास यासाठी उपाय सूचवणे आदी महाराष्ट्र कौन्सिलचे अधिकार, कर्तव्य व कार्य आहेत.

राज्यात होमिओपॅथीसाठी सुरू असलेल्या मॉडर्न फारमॅकोलॉजी कोर्सची प्रवेश क्षमता वाढविणे, कोर्स उत्तीर्ण झालेल्य होमिओपॅथ्‌सची प्रलंबित असलेली महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी पूर्ण करून देणे आदी महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील यांनी यावेळी दिली. अध्यक्षपदी निवड होण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, खा. धनंजय महाडिक, खा. राजू शेट्टी, होमिओपॅथी महाविद्यालय फेडरेशनचे अध्यक्ष विक्रम काळे, सचिव पृथ्वीराज पाटील, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. धनाजी बागल आदींसह मान्यवारांचे डॉ. पाटील यांना विशेष सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे