किर्लोस्कर ऑईल इंजिन्सतर्फे एड्स जनजागृती मोहीम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडने सामाजिक बांधिलकी उपक्रम, व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या वतीने गेली पाच वर्ष जनजागरण सुरू केले आहे.  ‘संवेदना’ उपक्रमामुळे एड्स नियंत्रणामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरेल असा आशावाद किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे सहउपाध्यक्ष कृष्णा गावडे यांनी व्यक्त केला. ते कनाननगर येथे संवेदना उपक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक दिलीप पोवार होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गावडे म्हणाले की, गेली पाच वर्षे किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी उपक्रम व एड्स नियंत्रण पथकाच्या वतीने  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमात विविध स्तरांमधून चांगला प्रतिसाद मिळत असून एड्स नियंत्रणाचे आशादायक चित्र जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहे. एड्स नियंत्रण कर्मचारी यासाठी अहोरात्र राबत आहेत.  प्रत्येकाने एड्सला हद्दपार करण्याचे स्वतःपासून ठरवले तर नक्कीच एचआयव्ही संसर्ग आटोक्यात येऊन एड्स मुक्त समाज निर्माण होईल, असे सांगितले.

दीपा शिपूरकर म्हणाल्या, डिसेंबर व जानेवारी महिन्यात एआरटी औषधे घेत नसलेल्या साधारणत ६०० रुग्ण शोधून त्यांना औषधांचे गांभीर्य समजावून देऊन बऱ्याच रुग्णांना पुन्हा औषधे चालू करण्यात आली. पुढचा टप्पा म्हणून शहरातील सर्व झोपडपट्ट्या व जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या लोकांची रक्त तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी  मकरंद चौधरी, संदीप पाटील,विनायक देसाई, कपिल मुळे, शुभम पाटील, निरंजन देशपांडे यांच्यासहीत जिल्ह्यातील सर्व एड्स नियंत्रण कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे