पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्या भारतीयांवरही बंदी : सिने एम्प्लॉइज फेडरेशनची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्यांचा विरोध सुरू झाला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे (FWICE) मुख्य सल्लागार अशोक पंडित म्हणाले की, एफडब्ल्यूआयसीईने जम्मू- काश्मीर मधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंडित पुढे म्हणाले की, ‘एफडब्ल्यूआयसीई यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्याचा हट्ट करणाऱ्या निर्मात्यांवरही बंदी घालू शकते, अशी आम्ही अधिकृत घोषणा करत आहोत. पाकिस्तानकडून आपल्यावर वारंवार हल्ले होत आहेत, एवढं असूनही पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्याचा हट्ट करणाऱ्या काही म्युझिक कंपन्यांना लाज वाटली पाहिजे. आता जर त्यांना लाज नसेल तर आम्हाला त्यांना मागे हटण्याची सक्ती करावी लागेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे