सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गिजवणे येथे उद्या महाआरोग्य शिबिर

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सदस्य, गडहिंग्लज अर्बन बँकेचे चेअरमन सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील विद्यामंदिरमध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गिजवणे ग्रामपंचायत, आय.एम.ए. आणि अॅस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या विद्यमाने रविवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते २ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग तज्ञ, हाडाचे, स्त्रीरोग, त्वचा, बालरोग जनरल सर्जन, कॅन्सर, कान, नाक, घसा, नेत्ररोग, दंत विकारतज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी होणार आहे. तसेच ई.सी.जी, रक्ततपासणी, चश्मा नंबर, हाडाचा ठिसूळपणा या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे