नवज्योतसिंग सिद्धूला भोवली पुलवामा हल्ल्यावरील बाष्कळ बडबड…

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या बाष्कळ बडबडीसाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेसी आमदार नवज्योत सिंग सिद्धूला पुलवामा हल्ला प्रकरणी बेताल वक्तव्ये करणे चांगलेच भोवले आहे. पाकची बाजू घेणारी वक्तव्ये केल्याने सोनी चॅनलवर सुरु असलेल्या कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मधून सिद्धूंची हकालपट्टी करण्यात आली. सोनी एंटरटेनमेंट चॅनलने सोशल मीडियावर वाढत्या विरोधानंतर हा निर्णय घेतला. आता या शोमध्ये सिद्धूची जागा अभिनेत्री अर्चना पूरण सिंग घेणार आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर बोलताना सिद्धू म्हणाले होते की, मूठभर लोकांसाठी अख्ख्या देशाला (पाकिस्तान) जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही. हा हल्ला अतिशय भ्याड असून त्याचा मी तीव्र निषेध करत आहे. कुठल्याही स्वरुपाचा हिंसाचार खपवून घेता येणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांना शिक्षा मिळायलाच हवी.”

दहशतवादी हल्ल्याने आधीच संतप्त असलेल्या सामान्य नागरिकांचा राग अनावर झाला. त्यांनी सोशल मीडियावर सिद्धूंची खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली.  सिद्धू द कपिल शर्मा शोचे जज्ज आहेत. त्यामुळे, या शोवरच बहिष्कार घालू अशी मोहीम सुरू करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर सोनी चॅनलने सिद्धू यांना शो सोडण्यास सांगितले आहे.  त्याची जागा अभिनेत्री अर्चना पुरणसिंग घेणार आहे.  अर्चनानेही याबाबत दुजोरा दिला असून तिने दोन एपिसोडचे शूटिंग पूर्ण केल्याचेही सांगितले आहे.

2 thoughts on “नवज्योतसिंग सिद्धूला भोवली पुलवामा हल्ल्यावरील बाष्कळ बडबड…”

  1. अतिरेक्यांच्या आधी सिद्धू सारख्या देशद्रोही लोकांना शिक्षा दिली पाहिजे.

  2. या सिद्धूला देशातून हाकलला पाहिजे….देशद्रोही हरामी…राजकारणासाठी नूसता त्या पाकिस्तानची चाटत असतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे