टिक्केवाडीतील आरोग्य शिबिरात ‘चारशे’वर रुग्णांची तपासणी… 

गारगोटी (प्रतिनिधी) :  टिक्केवाडी (ता. भुदरगड) ग्रामपंचायत आणि कै. प्रा.रमेश दळवी बहुउद्देशिय सामाजिक संस्था बसरेवाडी यांच्या विद्यमाने आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्धघाटन सरपंच सौ. कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरात सुमारे चारशेहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

या शिबीरात जनरल तपासणी, महिला व किशोरवयीन मुलींची तपासणी, धनुर्वाद इंजेक्शन, इसीजी, बीएमआय, ब्लडप्रेशर चेक, हृदय रोग,किडनी विकार, रक्त तपासणी आणि इतर आरोग्याबाबतची तपासणी करण्यात आली. तसेच या रुग्णांना मोफत औषध पुरवठा करण्यात आला. या शिबिराचा सुमारे चारशेहून अधिक रुगणांनी लाभ घेतला.

यावेळी डॉ. मंजित रजपुत, डॉ. संजय शिरगांवकर, डॉ. विजया पाटील, डॉ. अमित मगदुम, रणजित देसाई, उपसरपंच सविता कुह्राडे, सदस्य संतोष कांबळे, तानाजी गुरव, संभाजी पाटील, सविता जांभळे,अर्चना आसबे, वर्षा ढेकळे,सुनिल देसाई, अध्यक्ष संदीप दळवी,ग्रामसेवक तानाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे