मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमधील ताडदेव येथील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आज (शनिवार) सकाळी भीषण आग लागली. यात सात जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे १३ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.