मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने व कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील शाळा पुन्हा १५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता ही लाट ओसरत असून स्थानिक प्रशासनाला याची जबादारी देत राज्यातील शाळा २४ जानेवारी पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे राज्यातील प्राथमिक शाळासुद्धा सोमवारपासून सुरु होणार आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून स्थानिक प्रशासनाला याची जबादारी देत राज्यातील शाळा २४ जानेवारी पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक घेऊन एकंदरीत फाईल काल मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवली होती. त्यामध्ये शाळा सोमवारी सुरू करा अशी आम्ही विनंती केली होती. ती विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. येत्या सोमवारपासून संपूर्ण राज्यात प्राथमिक वर्गासह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी रुग्ण संख्या कमी आहे त्याठिकाणी नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील. जिथे रुग्ण संख्या जास्त असेल तिथे स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आमच्या नियमावलीत दोन गोष्टी टाकत आहोत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत. तसेच शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत. त्याचबरोबर १५  ते १८  वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच करावे अशी सुद्धा आमची मागणी आहे.