कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी पूल ते गंगावेश हा रस्ता शहराला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्याच्या कामासाठी आमदार फंडातून ५० लाखांच्या निधीचे पत्र जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी दिले असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

गंगावेश ते शिवाजी पूल हा शहरातील प्रमुख रस्ता असून या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ कायम असते. मात्र, या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने भागातील नागरिक आणि आखरी रास्ता कृती समितीने काम पूर्ण करावे अशी मागणी वारंवार केली होती. या रस्त्याच्या कामाला काँग्रेसचे दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांनी काही निधी मंजूर केल्यानंतर  रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ह्या रस्त्याचे काम प्रलंबित होते.

या रस्त्याचे काम व्हावे यासाठी मोर्चा, निवेदनेही महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आली होती. याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वतःच्या आमदार फंडातून तात्काळ ५० लाख रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात यावी यासाठी आज जिल्हा नियोजन मंडळाला पत्र दिले असल्याचे ना. पाटील सांगितले.