कडगाव (प्रतिनिधी) : गडसंवर्धनाचे ध्यास घेतलेल्या शिवाज्ञा परिवारातील तरुणांनी गेली कित्येक वर्षे सोनगड-किल्ल्याच्या खोल दरीतील अडकून पडलेल्या तोफा स्वराज्याभिषेक दिनी पुन्हा गडावर विराजमान करून कौतुकास्पद काम केले आहे.सोनगडावरील तोफा तब्बल १७५ वर्षे या दरीत पडून होत्या.

याचा शोध शिवाज्ञा गडसंवर्धनच्या सदस्यांनी दरीखोर्‍यातून घेत त्या पुन्हा गडावर आणण्यासाठी मेहनत घेतली. यावेळी शिवाज्ञाच्या सर्व सदस्यांनी सुमारे दोन हजार फूट खोल दरीत असणारी तोफ मोठ्या प्रयासाने गडावर आणली. तसेच गडावर तोफेच्या पूजनाबरोबरच संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कणकवलीहून आलेल्या महिलांनी केले. या मोहिमेत छ. संभाजी राजे, नरवडे पैकी पोवार वाडी, सावंतवाडी, लाडवाडी, घोलाणवाडी येथील ग्रामस्थ, महिला यांचे सहकार्य लाभले.