कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४७० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज (रविवार) दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून २१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –  २४९, आजरा – ६, भुदरगड – ६, चंदगड – १, गडहिंग्लज – १८, गगनबावडा – ३, हातकणंगले – १२, कागल – ८,  करवीर – ४१, पन्हाळा – १९, राधानगरी – ३, शाहूवाडी – २६, शिरोळ – १६, नगरपरिषद क्षेत्र – ४४  इतर जिल्हा व राज्यातील – ९ अशा ४७० जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – २, १०, ६१५

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – २, ०१, ९६५

मृतांची संख्या – ५, ८०८

उपचार सुरू असलेले रुग्ण –  २८४२