कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामान्य माणसाच्या हिताची भूमिका कणखरपणे मांडणारे आणि त्यासाठी टोकाची भूमिका घेणारे, परिवर्तन, प्रबोधन, पुरोगामी, समतावादी, समाजवादी, साम्यवादी, विज्ञानवादी, विवेकवादी अशा सर्वच चळवळींचे आधारवड ख्यातनाम विचारवंत, नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे, अशा शब्दांत आ. ऋतुराज पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

समाजाच्या हिताचा एखादा प्रश्न कसा आणि किती ताकदीने, अभ्यासपूर्ण पद्धतीने कसा मांडावा, याचा आदर्श वस्तुपाठ सरांनी घालून दिला. त्यांनी आयुष्यभर रस्त्यावर उतरून लढाई केली. तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. आमच्यासारख्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी ते आधारवड होते. माझे आजोबा डॉ. डी. वाय.पाटील आणि आमच्या कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. आज त्यांच्या जाण्याने कोल्हापूरचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.