कोल्हापूर (प्रतिनिधी) : कष्टकरी, शेतकरी व कामगारांचे नेते व ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.१८) दुपारी २ वाजता कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

त्यापूर्वी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सदर बाजार – विचारे माळ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात ठेवले जाणार आहे. त्यानंतर कोरोना प्रोटॉकलमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.