कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते, सामाजिक चळवळीतील अग्रणी डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्या  प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांनी  पाणीही घेतलेले नाही. दरम्यान, त्यांच्याकडून उपचारास फारसा प्रतिसाद मिळत  नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यांचा  सीटी स्कॅन करण्यात आला असून त्यांच्या मेंदूच्या काही भागांना इन्फान्ट झाला आहे. सध्या ते बेशुद्ध अवस्थेत आहेत. यापूर्वी त्यांच्या एक किडनीची शस्त्रक्रिया करून काढण्यात आली होती. त्यामुळे त्यांना रेनॉल फेल्यूअर आणि श्वास घेण्यास अडचण येत आहे. त्यांना हायफॉक्सीया झाले असून त्यांच्यावर सपोर्टिव्ह वैद्यकीय उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली.