मुंबई (प्रतिनिधी) :  कोरोनाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (बुधवार) राज्यातील कोरोना स्थितीबाबत आढावा घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी राज्यातल्या कोरोनास्थितीची माहिती पत्रकार परिषदमध्ये देत त्यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे.

ना. टोपे म्हणाले की, राज्याला आज ऑक्सिजनची मागणी ४०० मेट्रीक टन इतकी आहे. यापैकी २५० नॉन कोविड आणि १५० मेट्रीक टन कोविड रुग्णांसाठी लागत आहे. पण, ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रीक टनावर गेली की आपण लॉकडाऊन लावणार आहोत असं टोपेंनी ठणकावून सांगितले.