कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर असणाऱ्या आंबा घाटात आज (बुधवार) कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्विफ्ट कार थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच घनाटस्थळी पोलीस पथक दाखल झाले असून पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

मात्र, हा अपघात नेमका कसा झाला ? गाडीमध्ये नेमकी किती प्रवासी होती ? या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनास्थळी हेल्प अकॅडमीचे कार्यकर्ते सुद्धा दाखल झाले आहेत. पोलीस आणि हेल्प अकॅडमीच्या पथकाकडून घटनास्थळावर बचाव आणि मदतकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले आहे.