कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेच्या मालकीच्या भुईभाडयाने दिलेल्या जागांची मुदत संपली आहे. या जागा सात दिवसात पालिकेच्या ताब्यात द्यावी. अन्यथा पालिका प्रशासन कारवाई करून जागा ताब्यात घेणार असल्याची नोटीस पालिकेच्या जागेवर वास्तव करत असलेल्या अतिक्रमणधारकाना प्रशासक निखिल जाधव यांनी बजावली आहे.

नोटिसमध्ये म्हटले आहे की, पालिकेतर्फे आपणाला या ठिकाणी ठराविक मुदतीने भुईभाडयाने जागा मंजूर केलेल्या आहेत. या जागांची मुदत संपलेली असून,  या जागा महाराष्ट्र नगरपरिषदा (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण) नियम तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियममधील तरतुदीन्वये आहे. त्या पूर्ववत अवस्थेत ही नोटीस मिळालेपासून सात दिवसांचे आत नगरपरिषदेच्या ताब्यात द्यायच्या आहेत.

तसे न झाल्यास या जागा कायद्यात नमूद केल्याप्रमाणे ताब्यात घेण्याबाबतची एकतर्फी कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी याबाबत नागरिकांनी पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणधारकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे म्हटले आहे.