मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार शरद पवार यांना दिला आहे का ?, मुख्यमंत्री आणि प्रशासनातील अधिकारी नसताना पवार अशी बैठक कशी काय घेऊ शकतात ?, पवार यांना अशा बैठका घ्यायच्या असतील, तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत ?, असे प्रश्न उपस्थित करत भाजपचे आ. राम कदम यांनी टीका केली आहे.  

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक घेतली. यावेळी एसटी कामगारांच्या २२ संघटनांच्या प्रतिनिधींनी पवारांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीवर कदम यांनी टीका केली आहे. आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या नियमांचे पालन करा. स्वत:च्या मनमर्जीप्रमाणे संविधान आणि घटनेचा सरकारला अपमान करता येणार नाही, असेही राम कदम यांनी म्हटले आहे.