कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्टोन क्रेशर व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी ११ लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच घेताना राधानगरी तालुक्यातील फराळे येथील सरपंच संदीप डवर आणि प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना आज (रविवार) ताब्यात घेण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रधान यांच्या घराची (रा. प्लॉट नं. ३०३, सी विंग, विंड गेट अपार्टमेंट, न्यू पॅलेस, कोल्हापूर) इथे पोलीसांनी झाडाझडती घेतली. यावेळी प्रधान याच्या घरातून ९ लाख १३ हजार इतकी रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्रधान याने या रकमेचा खुलासा न दिल्याने ही रक्कम पोलीसांनी जप्त केली आहे.