हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पं.स. सभागृहात आज (गुरुवार) माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या उपस्थितीत पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. मिणचेकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी डॉ. मिणचेकर म्हणाले, बदलत्या काळाबरोबर आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान पत्रकारांनी आत्मसात करावे. पत्रकारांनी सामान्य माणसांना केंद्र बिंदू मानून निर्भिडपणे पत्रकारिता करावी. राजकारणी आणि पत्रकार यांनी एकमेकाला समजून घेऊन काम केले तर अनेक वंचित घटकांना न्याय मिळून लोकशाही आणखीन बळकट होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी हातकणंगले तालुक्यातील पत्रकारांच्यासाठी भवन होणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी डॉ. मिणचेकर यांनी लक्ष घालावे. तसेच पत्रकारांच्यासाठी वैयक्तिक विमापॉलिसी डॉ. सुजित मिणचेकर फाऊंडेशनच्या वतीने मिळावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी पं.स. सदस्य पिंटू मुरूमकर, अनिल उपाध्ये, सहायक गटविकास अधिकारी देशमुख, पोपटराव वाक्से, पापालाल सनदी आदी उपस्थित होते.