कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी आज (गुरुवार) विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.

कोल्हापुरातील जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे आभार व्यक्त केले. तसेच खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे, एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्या अमूल्य पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन, अशा भावना पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.