पुणे  (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुणे जिल्हा बँकेवर  सत्ता काबीज केली. बँकेच्या संचालकापदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवार) झाली. २१ पैकी १४ जागा बिनविरोध केल्यानंतर ७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात ७ पैकी ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले.

सुनील चांदेरे, आमदार अशोक पवार, विकास दांगट असे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर बिनविरोध निवडून आलेल्या १४  संचालकांपैकी १३ संचालक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर प्रदीप कंद निवडून आले आहेत. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. बँक पतसंस्थांच्या गटामधून  प्रदीप कंद  ११  मतांनी विजयी झाले आहेत.