पिंपरी (प्रतिनिधी) : खुनाच्या प्रकरणातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर  चाकण परिसरातील कोये येथे गोळीबार झाला. यात कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाले. अर्धा तासाच्या चकमकीनंतर पोलिसांनी आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांना अटक केली.  

पिंपरी-चिंचवडमध्ये गोळ्या झाडून योगेश जगताप या तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण फरार होते. या दोघांचा शोध घेण्यासाठी सांगवी पोलिसांची तीन पथके, गुंड स्कॉड आणि गुन्हे शाखा युनिट चार तपास करत होती.

दरम्यान, कोये परिसरातील एका टेकडीवर हे आरोपी लपून बसले होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिस केले असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही त्यांना  चोख प्रतिउत्तर दिले. अखेर आरोपींकडील गोळ्या संपल्यानंतर  पोलिसांनी  गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश मानेला अटक केली.