कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीरचे आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, तर चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली.  

करवीर तालुका विकास सेवा संस्था गटातून आमदार पी. एन. पाटील, राधानगरी विकास सेवा गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांची तर चंदगड तालुका विकास सेवा संस्था गटातून चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे.