टोप (प्रतिनीधी) :  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नागांव येथील तरूणी जागीच ठार झाली. ती कामावरून घरी येत असताना हा अपघात झाला . रोहिणी रमेश कांबळे (वय २०, रा. समतानगर  नागांव,  ता. हातकणंगले) असे या मृत तरुणीचे नाव आहे.

रोहणी ही गांधीनगर येथे काम करीत होती. ती आठ वाजण्याच्या सुमारास कामावरून सुट्टी करून घरी जात होती. घरी जाण्यास वहान नसल्याने रोहिणीने आपल्या नातेवाईकाला फोन करून घरी सोडण्यासाठी सांगितले. ती तावडे हॉटेल येथून गाडी क्र. एमएच ०९ ईपी २०२८ वरून घरी जात होती. यावेळी शिरोली येथील उड्डाण पुलावर आले असता पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वहानाने धडक दिल्याने रोहीणी गाडीवरून पडून चाकाखाली सापडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात आली आहे.

.