कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर परिसरात दोन रानगवे आढळून आले होते. हे गवे पुन्हा त्यांच्या अधिवासात परत गेले आहेत. वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्याचे आढळल्यास अथवा वनविभागाशी संबंधित काही माहिती हवी असल्यास यासाठी ‘हॅलो फॉरेस्ट 1926’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक रावसाहेब काळे यांनी आज (शुक्रवार) येथे केले.  

कोल्हापूर शहर परिसरातील मानवी वस्तीत गव्याचा वावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर  पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक झाली. यावेळी काळे बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे आदी उपस्थित होते.