कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना  सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये फिनिशर मेडल मिळाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन विश्‍वास पाटील यांचे हस्‍ते व  संचालकांच्या उपस्थित करण्‍यात आला.

विश्‍वास पाटील म्‍हणाले की, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले मॅरेथॉन, सायकलिंग, पोहणे, ट्रायथलॉन अशा अनेक स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. त्यांचे काम कौतुकास्पद आहे. व्यायाम आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून सर्वांनी दिवसातून थोडा तरी वेळ काढून व्यायाम करायला हवा. तसेच संघांतर्गत भविष्यात कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्याचा मानस असल्याचे  त्यांनी सांगितले.

योगेश गोडबोले म्‍हणाले की, मॅरेथॅानचे अंतर २१ किलोमीटर पूर्ण केले आहे. व सातारा हिल मॅरेथॉनमध्‍ये सलग पाच वेळा भाग घेतला आहे. हाफ मॅरेथॉनमध्‍ये आजपर्यंत ३१ वेळा भाग घेतला आहे. मी अलीकडेच ७ वर्षांपूर्वी माझा क्रीडा क्रियाकलाप सुरू केला आणि माझा विश्वास आहे की कोणताही खेळ सुरू करण्यासाठी वय हा अडथळा नाही. फक्त इच्छाशक्ती, समर्पण, दृढनिश्चय आणि केंद्रित दृष्टीकोन आवश्यक आहे.

याप्रसंगी ज्येष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.