कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील कॅन्टीन परिसरातून सलग दोन दिवसात दोन मोटरसायकली चोरट्यांनी लांबवल्या. अमर राजाराम काळे (रा. सावर्डे तर्फ असंडोली, ता.पन्हाळा) आणि मधुकर महादेव कुंभार (रा. कसबा बीड, ता.करवीर) यांनी कळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर काळे यांची ब्लॅक ग्रे रंगाची हिरो होंडा फॅशन गाडी क्र. एम.एच.०९ सीई ३१४२ ही ३ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास कळे-गगनबावडा रस्त्यावर मल्हारपेठ-सावर्डे फाट्यावर असणाऱ्या विजय अमृततुल्य चहा दुकानासमोरून गाडी चोरीला गेली आहे.

तसेच मधुकर कुंभार यांची सिल्वर ब्लॅक रंगाची स्पेंल्डर गाडी क्र. एम. एच ०९ डीएन ९८४६ ही ४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास कळे येथील स्वस्तिक हॉटेलच्या समोरून चोरीला गेली आहे. या अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून मोटारसायकली लांबवल्या आहेत. या अज्ञांता चोरट्यांविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.