शरद पवार यांच्या दौऱ्यात ठरणार ‘चंदगड’मधील उमेदवार ?

गडहिंग्लज (नितीन मोरे) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.  या दौऱ्यात ते आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. यंदा लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत ते प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. चंदगडमधून आ. संध्यादेवी कुपेकर यांना की त्यांच्या कन्या सौ. नंदाताई बाभूळकर यांना उमेदवारी मिळणार याबाबत कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे.

(जाहिरात – फर्निचर खरेदीवर ३० टक्के डिस्काऊंट ! सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन

बाचूळकर फर्निचर मॉल…

आजच भेट द्या… एन एच – ४, कालेश मंदिरानजीक,
गोकुळशिरगाव, कोल्हापूर. संपर्क – 9890379444.)

चंदगड मतदारसंघाची पुनर्रचना झालेपासून त्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. स्व.बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आमदार आहेत. पण आता कार्यकर्त्यांमधून त्यांना विश्रांती देऊन त्यांच्या कन्या सौ. नंदाताई यांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, शरद पवार कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतील असे वाटते. त्याचप्रमाणे  शिवसेनेचा चंदगड विधानसभा मतदारसंघावर वाढता असलेला प्रभाव याबाबत देखील चर्चा दौऱ्यात होऊ शकते. गडहिंग्लज तालुक्यातील काही पक्षातले नेते देखील शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने एकावेळी अनेक जुळणी लागतील. या दौऱ्याच्या निमित्ताने शरद पवार हे विधानसभेसाठी व्यूहरचना करण्याची शक्यता असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जंगी स्वागताची तयारी…

शरद पवार यांचे कोल्हापूरहून संकेश्वर मार्गे एकच्या सुमारास आगमन होणार आहे. या वेळी हिटणी नाका, दुंडगे, भडगाव, नेसरी आदी ठिकाणी त्यांचे स्वागत केले जाणार आहे. तसेच कानडेवाडी येथे बाबासाहेब कुपेकर यांच्या समाधीला भेट देऊन ते आ. कुपेकर यांच्या निवासस्थानी भोजनास जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे