सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या १ मताने पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी संतापाच्या भरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे पुन्हा एकदा साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.  

यावेळी शिंदेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्यात. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश धुड़कावून ज्यांनी शशिकांत शिंदेंविरोधात कट रचला, त्याचा निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली, असे दगडफेक करणाऱ्या शिंदे समर्थकांनी सांगितले. आम्ही सर्व राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आज फक्त एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्यात आल्याने आम्ही दगडफेक करुन निषेध करत आहोत, असेही या कार्यकर्त्यांनी सांगितले.