कोल्हापुरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात २६ कामगार संघटनांचा एल्गार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरण अवलंबले असल्याचा आरोप करीत, कोल्हापुरातील विविध २६ कामगार संघटनांनी आज(मंगळवार) एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. सत्ताधारी भांडवलदारांचे हित जोपासत आहे अशी टीका या वेळी करण्यात आली. या प्रश्नी उद्या (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वा. होणाऱ्या निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

(जाहिरात – फर्निचर खरेदीवर ३० टक्के डिस्काऊंट ! सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन

बाचूळकर फर्निचर मॉल…

आजच भेट द्या… एन एच – ४, कालेश मंदिरानजीक,
गोकुळशिरगाव, कोल्हापूर. संपर्क – 9890379444.)

या वेळी अतुल दिघे म्हणाले, काही केंद्र सरकार भांडवलदारांचे हित जोपासत आहे. त्यामुळे यांनाच ‘अच्छे दिन’ आलेत. ते आम्हाला आलेले नाहीत. याचे कारण म्हणजे सरकारने राबविलेली कामगार विरोधी धोरणे होय. कर्मचाऱ्यांनी किमान वेतन १८ हजार रुपये अधिक महागाई भत्ता, कंत्राटीकरण रद्द करा, मानधनी सेवेची पद्धत रद्द करा, मानधन नको-वेतन द्या, रेल्वे विमा संरक्षण खात्यात परदेशी गुंतवणूक धोरण रद्द करा आदी मागण्यांबाबत आज दुपारी टाऊन हॉल येथून कामगार संघटना संयुक्त कृति समितीने मोर्चास सुरुवात केली. या वेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकरी सीपीआर चौक, दसरा चौक, सुभाष रोड, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकिज, आझाद चौकमार्गे बिंदू चौकात मोर्चाची सांगता झाली.

मोर्चात इंटक, आयटक, वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना, आशा वर्कस, भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग- ३ या संघटनांच्या प्रतिनिधींसह एस.बी.पाटील, बाबूराव तारळी, बी.एल.बरगे, नामदेव गावडे, डॉ. सुभाष जाधव, शाहीर सदाशिव निकम आदी मान्यवरांचा सहभाग होता. दिलीप पवार यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे