मुंबई (प्रतिनिधी) : तळीरामांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बनावट मद्यविक्रीवर आळा बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे परदेशी मद्य घेणाऱ्या मद्यपींसाठी ही आनंदाची बातमी आहे. परदेशातून आयत होणाऱ्या मद्याचे दर आता कमी होणार आहे. कोरोना काळात मद्याचे दर जास्त होते. मात्र, आता हे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  परदेशातून आयात होणाऱ्या मद्यावरील विशेष शुल्काच्या दरात कपात करण्याचा निर्णय  राज्य सरकारने घेतला आहे. 

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बनावट मद्यविक्रीवर आळा येईल असं सांगण्यात येत आहे. आयात मद्यावरील विशेष शुल्क ३०० टक्क्यावरून १५० टक्क्यांवर करण्यात आले आहेत.